Posts

कौशल्य आधारित शिक्षण काळाची गरज

Image
 08/10/2026 कौशल्य आधारित शिक्षण काळाची गरज ;लक्ष्मण मोहिते काल श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालय म्हसवड ता माण जि सातारा येथे मराठी विभागाच्या 'अशी सुचते कथा"'या कार्यशाळेला प्रमुख अतिथी म्हणून जाता आलं. तेथे प्राचार्य डॉ विकास काकडे यांची भेट झाली.आम्ही कौशल्य आधारित शिक्षण या विषयावर चर्चा करताना त्यांनी काही माहिती सांगितली.ते असं म्हणाले, 01)आज शिक्षकाने विद्यार्थाना कौशल्य आधारित शिक्षण देणे गरजेचे आहे. 02)त्याला शिक्षणातून रोजगार मिळाला पाहिजे. 03)तो कॉलेज कडे आला पाहिजे. 04)त्याचं शिक्षकांशी बॉंडिंग असले पाहिजे 05)प्रत्येक विषय कसा महत्वाचा आहे हे समजून सांगितलं पाहिजे.मग तो त्याच्या आवडीचा विषय निवडू शकतो. 06)त्यांचा विषय संख्या शास्त्र आहे, मग त्यांनी बारामतीत एका विद्यालयात 5 वी ते 7 वी व 8 वी ते 10 वी असे दोन ग्रुप करून संख्याशास्त्राचे महत्व व त्याचा आपल्या जीवनात कसा उपयोग होतो.याची माहिती दिली. 07)याचा फायदा काय होतो तर या वयापासून विद्यार्थ्यांना विषयांची माहिती होते. 08)त्याच बरोबर त्यांना कॉलेज दाखवले पाहिजे,विभाग दाखवले पाहिजे. 09)यातून त्यांच्या ...