कौशल्य आधारित शिक्षण काळाची गरज

 08/10/2026




कौशल्य आधारित शिक्षण काळाची गरज


;लक्ष्मण मोहिते


काल श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालय म्हसवड ता माण जि सातारा येथे मराठी विभागाच्या 'अशी सुचते कथा"'या कार्यशाळेला प्रमुख अतिथी म्हणून जाता आलं.


तेथे प्राचार्य डॉ विकास काकडे यांची भेट झाली.आम्ही कौशल्य आधारित शिक्षण या विषयावर चर्चा करताना त्यांनी काही माहिती सांगितली.ते असं म्हणाले,

01)आज शिक्षकाने विद्यार्थाना कौशल्य आधारित शिक्षण देणे गरजेचे आहे.

02)त्याला शिक्षणातून रोजगार मिळाला पाहिजे.

03)तो कॉलेज कडे आला पाहिजे.

04)त्याचं शिक्षकांशी बॉंडिंग असले पाहिजे

05)प्रत्येक विषय कसा महत्वाचा आहे हे समजून सांगितलं पाहिजे.मग तो त्याच्या आवडीचा विषय निवडू शकतो.

06)त्यांचा विषय संख्या शास्त्र आहे, मग त्यांनी बारामतीत एका विद्यालयात 5 वी ते 7 वी व 8 वी ते 10 वी असे दोन ग्रुप करून संख्याशास्त्राचे महत्व व त्याचा आपल्या जीवनात कसा उपयोग होतो.याची माहिती दिली.

07)याचा फायदा काय होतो तर या वयापासून विद्यार्थ्यांना विषयांची माहिती होते.

08)त्याच बरोबर त्यांना कॉलेज दाखवले पाहिजे,विभाग दाखवले पाहिजे.

09)यातून त्यांच्या मनात कुतूहल जागृत होते,आवड निर्माण होते.

10)आणि प्राध्यापक किंव्हा शिक्षक यांनी आपल्या अध्यापणावरच लक्ष केंद्रित केलं पाहिजे.पगाराव्यतिरिक्त अन्य पैश्याचा हव्यास धरता कामा नये.

11)शेवटी त्यांना त्यांचं काम शांतपणे करण्यास वाव दिला पाहिजे.उगीच अन्य कामात व्यस्त ठेवणे म्हणजे विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होण्यासारखे आहे.

12)बॉंडिंग मुळे, विद्यार्थी संपर्कात येतो,याचं एक उदाहरण त्यांच्या विद्यार्थ्यांचे दिले ते असं की;साधं किराणा दुकान असणाऱ्या कुटुंबातील मुलगा मार्गदर्शनातून RBI बँकेत मोठया पदावर जातो.आज तो आर्थिक दृष्ट्या स्थिर आहे.मोठं मोठी धोरणं तो आखतो.


खरं तर या गोष्टी झाल्या पाहिजेत.यातून स्वावलंबी व चिकित्सक विद्यार्थी घडू शकतो.हे मला पटलं.




Comments